उपलब्ध सवलती आणि प्रमोशन्स
तुम्ही भाड्यानुसार, तुमच्या कॅलेंडरमधील घरांसाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही सवलती आणि प्रमोशन्स सेट करू शकता, त्यात बदल करू शकता किंवा डिलीट करू शकता . तुम्ही लिस्टिंग एडिटरच्या सेवा आणि अनुभवांसाठीही असेच करू शकता. उपलब्ध ऑफर्समध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
घरे
- नवीन लिस्टिंग प्रमोशन: जेव्हा तुमच्याकडे नवीन लिस्टिंग असते, तेव्हा तुम्ही तुमच्या पहिल्या 3 बुकिंग्जवर 20% सवलत देऊ शकता
- कस्टम प्रमोशन: तुमच्या होम लिस्टिंगमध्ये किमान 3 बुकिंग्ज असल्यास, तुम्ही कस्टम प्रमोशन ऑफर करू शकता - फक्त तुमच्या तारखा आणि तुमची सवलत निवडा
- वास्तव्याच्या कालावधीच्या सवलती: तुमच्या जागेवर दीर्घकालीन रिझर्व्हेशन्स बुक करण्यासाठी गेस्ट्सना सवलत द्या. तुम्ही नियम - सेट्स वापरून तयार केलेला आठवडा, महिना किंवा कस्टम कालावधीनुसार सवलत देऊ शकता
- अर्ली - बर्ड सवलती: आणखी आगाऊ बुकिंगसाठी सवलत जोडा
- शेवटच्या क्षणी सवलती: चेक इनची तारीख जवळ येताच तुमचे प्रति रात्र भाडे कमी करा
सेवा आणि अनुभव
- मर्यादित वेळ: सेवा किंवा अनुभवांसाठी पहिल्या बुकिंग्जना प्रोत्साहित करण्याकरता पुढील 30 दिवसांसाठी डील ऑफर करा
- अर्ली बर्ड: दोन आठवड्यांपेक्षा आधी बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सना कमी भाडे द्या
- मोठे ग्रुप्स: मोठ्या ग्रुप्सना सवलत देऊन त्यांना आकर्षित करा