सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
कसे-करावे • घराचे होस्ट

विशेष ऑफर्स पाठवणे

विशेष ऑफर्स, वेगवान बुकिंग्ज मिळवण्याचा किंवा तुमच्यासाठी जास्त सोयीस्कर असलेले ट्रिपचे तपशील सुचवण्याचा, एक उत्तम मार्ग आहेत.

ऑफर्स कशा काम करतात

बुक करण्यापूर्वी किंवा ट्रिपची विनंती सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला कोणी मेसेज पाठवल्यास, तुम्ही त्यांना कस्टम भाड्याचा समावेश असलेल्या विशेष ऑफरसह उत्तर देऊ शकता. तुम्ही वेगळ्या तारखा किंवा तुमच्या इतर जागांपैकी दुसरी एखादी जागा देखील सुचवू शकता. तुमची ऑफर स्वीकारण्यासाठी त्यांच्याकडे 24 तास असतील आणि त्यांनी ऑफर स्वीकारल्यावर त्यांचे रिझर्व्हेशन ऑटोमॅटिक पद्धतीने कन्फर्म होईल.

त्यांनी आधीच तुमच्या जागेचे बुकिंग केले असल्यास किंवा विनंती केली असल्यास, तुम्ही विशेष ऑफर पाठवू शकत नाही—परंतु तुम्ही रिझर्व्हेशन तपशील बदलून त्यांना सवलत देऊ शकता.

प्रथम, तुमचे कॅलेंडर मोकळे असल्याची आणि तुमच्या ऑफरमधील तारखांसाठी तुमच्याकडे कोणत्याही प्रलंबित विनंत्या नसल्याची खात्री करा—तुमच्याकडे विनंत्या असल्यास, तुम्हाला त्या नाकाराव्या लागतील. तसेच, तुम्हाला गेस्टना होस्ट करायचे आहे हे निश्चित करा, कारण त्यांनी ऑफर स्वीकारल्यावर त्यांची ट्रिप ऑटोमॅटिक पद्धतीने कन्फर्म होईल.

विशेष ऑफर पाठवण्यासाठी

डेस्कटॉपवर विशेष ऑफर पाठवा

  1. मेसेजेस वर क्लिक करा आणि तुमच्या गेस्टने पाठवलेला मेसेज उघडा
  2. विशेष ऑफर वर क्लिक करा
  3. सबटोटलच्या खाली, तुमच्या वास्तव्याच्या संपूर्ण कालावधीसाठी तुम्हाला जे भाडे ऑफर करायचे आहे हे ते एन्टर करा
  4. विशेष ऑफर पाठवा वर क्लिक करा

लक्षात ठेवा:

  • भाड्यामध्ये रिझर्व्हेशनच्या सर्व रात्रींचा समावेश असावा
  • सर्व प्रकारचे अतिरिक्त शुल्क समाविष्ट केल्याची खात्री करा, जसे की स्वच्छता शुल्क
  • तुम्ही आमचे ऑफलाईन शुल्क वैशिष्ट्य वापरत असल्यास कर, सेवा शुल्क किंवा सिक्युरिटी डिपॉझिट समाविष्ट करू नका (कर आणि सेवा शुल्क ऑटोमॅटिक पद्धतीने जोडले जातील, आणि सिक्युरिटी डिपॉझिट्स स्वतंत्रपणे हाताळल्या जातील)
  • 28 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या विशेष ऑफर्ससाठी, तुम्ही एकतर सबटोटल (संपूर्ण रक्कम) किंवा मासिक भाडे ऑफर करणे निवडू शकता
  • तुमच्या अकाऊंटसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती तुम्ही पुरवली नसल्यास Airbnb तुमचे कॅलेंडर ब्लॉक करू शकते, म्हणूनच संपूर्ण माहिती पुरवणे सुनिश्चित करा.

त्यानंतर आम्ही गेस्टना ऑफरच्या तपशीलांविषयी सूचित करू ज्यामध्ये कर आणि सेवा शुल्क स्वतंत्रपणे नमूद केले असतील.

एकापेक्षा जास्त ऑफर्स पाठवणे

जेव्हा तुम्ही अनेक गेस्ट्सना समान तारखांसाठी विशेष ऑफर्स पाठवता, तेव्हा जे गेस्ट प्रथम ऑफर स्वीकारतात ते ऑफर जिंकतात. म्हणूनच, इतर गेस्टसना देखील त्याच तारखा बुक करण्यात रस असू शकतो हे नमूद करून, तुमचे मेसेजेस पारदर्शक ठेवण्याची आम्ही शिफारस करतो.

या लेखाचा उपयोग झाला का?

संबंधित लेख

तुमची रिझर्व्हेशन्स, अकाऊंट आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी मदत मिळवा.
लॉग इन करा किंवा साईन अप करा