तुम्ही Klarna पेमेंट प्लॅन घेतलेला असलातरीही तुम्ही तुमचे रिझर्व्हेशन कॅन्सल करू शकता. पण लक्षात घ्या की तुम्हाला ट्रिपचे कॅन्सलेशन Airbnb वरूनच करावे लागेल, Klarna कुठल्याही प्रकारे रिझर्व्हेशन्स कॅन्सल करू शकत नाहीत.
जर तुम्ही Klarna पेमेंट प्लॅन घेतला असेल आणि एखाद्या वास्तव्याचे रिझर्व्हेशन कॅन्सल केले, तर तुमचा रिफंड त्या रिझर्व्हेशनच्या कॅन्सलेशन धोरणाप्रमाणे मिळेल. तसेच, तुमचा Klarna पेमेंट प्लॅन कॅन्सल केला जाईल आणि लागू असल्यास, तुमच्या पेमेंट प्लॅनच्या बॅलन्सच्या आधारे, Klarna ला रिफंड पाठवला जाईल आणि मग तो तुम्हाला मिळेल.
तुम्ही रिफंडसाठी पात्र असल्यास, तो मिळण्यासाठी कामकाजाचे 5 ते 7 दिवस लागू शकतात.
टीप: तुम्हाला Klarna कडून रिफंड केलेली रक्कम Airbnb ने Klarna ला रिफंड केलेल्या रकमेपेक्षा वेगळी असू शकते. Klarna पेमेंट प्लॅन्सच्या अंतर्गत दिले गेलेले व्याज, Klarna द्वारे रिफंड केले जाणार नाही.
कॅन्सलेशनचे उदाहरण 1
जूलियाने हवाईला जाण्यासाठी काही महिन्यांनंतरची ट्रिप Klarna वरून 4 हप्त्यांमध्ये पेमेंट करून बुक केली आहे. रिझर्व्हेशनचा एकूण खर्च $800 आहे. याचा अर्थ असा की जूलियाने आधी $200 चे पेमेंट केले. ($800/4 = 200)
दुर्दैवाने, जूलियाला हवाईची ट्रिप कॅन्सल करावी लागली. ट्रिपच्या कॅन्सलेशन धोरणानुसार, पूर्ण रिफंड मिळण्यासाठी जूलियाला चेक इनच्या किमान 30 दिवस आधी कॅन्सल करावे लागेल.
जूलियाने तिची ट्रिप वेळेवर कॅन्सल केली आणि Klarna पेमेंट प्लॅन प्रमाणे Klarna ने तिला $200 चे सुरुवातीचे पेमेंट रिफंड केले.
कॅन्सलेशनचे उदाहरण 2
मॅडिसनने फ्रांसला जाण्यासाठी ट्रिप Klarna वरून 4 हप्त्यांमध्ये पेमेंट करून बुक केली. ट्रिपचा एकूण खर्च $500 आहे. याचा अर्थ असा की मॅडिसनने आधी $125 चे पेमेंट केले ($500/4 = 125)
मॅडिसनला नंतर कळते की तिला ट्रिप कॅन्सल करावी लागेल. ट्रिपची तारीख पुढील दोन आठवड्यांत आहे. ट्रिपचा संपूर्ण रिफंड मिळवण्यासाठी, मॅडिसनला चेक इनच्या किमान 30 दिवस आधी कॅन्सल करणे आवश्यक होते.
हे कॅन्सलेशन उशीरा झालेले असल्यामुळे आणि कॅन्सलेशन धोरणाप्रमाणे ट्रिपच्या खर्चाचा केवळ 50% रिफंड मिळणार असल्यामुळे, Airbnb कडून Klarna ला $250 चा रिफंड मिळेल आणि पेमेंट प्लॅन संपण्याच्या तारखेच्या आधी मॅडिसनला Klarna ला $125 आणखी द्यावे लागतील.
फरकासाठी Airbnb हा रिफंड Klarna ला पाठवेल. हा रिफंड तुमच्या Klarna अकाऊंटमध्ये दिसण्यासाठी कामकाजाचे 14 दिवस लागू शकतात.
परंतु, आम्ही Klarna ला रिफंड पाठवल्यानंतर, आम्ही Klarna रिफंड स्टेटसबद्दल अतिरिक्त माहिती देऊ शकत नाही. Klarna ने जारी केलेल्या रिफंड्सच्या कोणत्याही तपशिलांसाठी, त्यांच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधा.
जर तुम्ही ट्रिपला कॅन्सलेशन धोरणातील रिफंड मिळण्याच्या कालावधीमध्ये कॅन्सल करू शकला नाहीत, तर तुम्हाला रिझर्व्हेशनचा एकूण खर्च आणि त्या रिझर्व्हेशनच्या कॅन्सलेशन धोरणाप्रमाणे रकमेचे पेमेंट करावे लागेल. याचा अर्थ असा, की तुमच्या पेमेंट प्लॅनच्या सध्याच्या बॅलन्सनुसार, तुम्हाला अजूनही Klarna ला अतिरिक्त पेमेंट करावे लागू शकते.
Airbnb वरील प्रत्येक बुकिंगसाठी मोठ्या समस्यांकरता गेस्ट्सना AirCover संरक्षण मिळते, यामध्ये चेक इनच्या 30 दिवसांच्या आत होस्टने केलेले कॅन्सलेशन सामील आहे.
होस्टने तुमचे बुकिंग कॅन्सल केले अशा फार कमी होणाऱ्या घटनांसाठी, पेमेंट केलेल्या रकमेकरता आम्ही ऑटोमॅटिक पद्धतीने Klarna ला रिफंड पाठवतो. मग Klarna तुम्हाला तुमच्या पेमेंट प्लॅनच्या बॅलन्सच्या आधारे रिफंड देईल.